लंडनमध्ये उभारणार “छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र”; महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

💥💥 ब्रेकिंग न्यूज

🟣 लंडनमध्ये उभारणार “छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र”; महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

मुंबई – महाराष्ट्र शासनाने लंडनमधील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला ९९ वर्षांच्या करार तत्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परदेशात मराठी संस्कृती, परंपरा आणि उत्सवांचा ध्वज १९३२ पासून अभिमानाने फडकवणाऱ्या या संस्थेमुळे लाखो मराठी बांधव जोडले गेले आहेत.

 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लवकरच या इमारतीचे रूपांतर “छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र (CSMVK)” मध्ये करण्यात येणार आहे.

 

🌍 या निर्णयामुळे “माय मराठी”ला जागतिक स्तरावर नवा मान मिळणार असून, परदेशातील मराठी बांधवांसाठी हे केंद्र एकत्र येण्याचे, संवाद साधण्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे भक्कम व्यासपीठ ठरणार आहे.

 

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, “हा निर्णय परदेशातील मराठी बांधवांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणणारे केंद्रबिंदू ठरणार आहे.”

 

 

📌 हॅशटॅग

 

#मायमराठी #GlobalMarathi #CSMVK #Maharashtra #LondonMarathiMandir #UdaySamant #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar

 

📷

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें