दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभे बाबत कोकण आयुक्तांनकडून दोषरोप सिद्ध

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभे बाबत कोकण आयुक्तांनकडून दोषरोप सिद्ध

सरपंच महेश करगुटकर, आणि उपसरपंच सुविधा विवेक खडपे यांच्यवर होणार कारवाई

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

 

राजापूर:-( दळे) :- राजापूर तालुक्यातील *मनमानी कारभार* ने गाजलेली ग्रामपंचायत दळे मधील ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ ची पायमल्ली करून,आपल्या अधिकारात लावलेल्या ग्रामसभा अंगलटी आल्याचे चित्र दिसत आहे.सदर, तक्रार होळी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, नंतर अनेक चौकश्या,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारवाई ची कोकण आयुक्तांना शिफारस या सर्व प्रकरणात स्थानिक पातळीवर केलेला वेळ काढूपणा अश्या सर्व चक्रव्यूहातुन कोकण आयुक्तांकडुन पत्र क्र.२१८२७३३/२५ दि.२५/७/२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या पत्राद्वारे आदेशीत केली की, महाराष्ट्र अधिनियम १९५८ कलम ३९ ( खंड१) मधील तरतुदीनुसार महेश करगुटकर सरपंच आणि श्रीमती सुविधा विवेक खडपे उपसरपंच ग्रामपंचायत दळे,राजापूर, जि. रत्नागिरी यांनी कार्यव्यात कसूर केली असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार खालीलप्रमाणे दोषारोप सिद्ध करीत आहे.

◆सरपंच महेश करगुटकर यांनी पंचायतीकडून आगाऊ रजा मंजुर करून जाणे असताना,तशी कार्यवाही न करता कर्तव्यात कसुर करणे.

◆ सरपंच करगुटकर यांनी नियमबाह्य ठिकाणी लावण्यात आलेल्या दि.२३/८/२४ च्या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज करणे.

◆ श्रीमती सुविधा विवेक खडपे यांच्याकडे सरपंच पदाचा कारभार नसतानाही ग्रामसभेच्या दि.१२/८/२४ च्या अजेंड्यावर स्वाक्षरी करणे.अश्या प्रकारे कोकण आयुक्तांनी दोषारोप सिद्ध केले आहेत.

कोकण आयुक्तांच्या या पात्राच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संमधीत सरपंच आणि उपसरपंच यांना दोषारोप नोटीस बाजावणीसाठी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले असून,सदर पत्र जोडून गटविकास अधिकारी राजापूर यांनी ग्रामविकास अधिकारी दळे यांना सदर दोषारोप कोकण आयुक्तांकडून सिद्ध झाले असून,त्यांना नोटीस बजावून दिनंकीत करून तसा अहवाल पाठविण्यासाठी आदेशीत केले आहे.तसे पत्र ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना दोषारोप नोटिस बाजाउन कळीत केले असल्याचे समजते, परतू, सोमवारी पर्यत बजावणी नोटीस ला उत्तर किव्हा साह्य करून दिल्या नसल्यास माझा अहवाल मी गटविकास अधिकारी राजापूर यांना देण्यात असल्याचे आमचे प्रतिनिधी शी बोलताना ग्रामविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांनी म्हटले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]