उद्या गुहागर पंचायत समितीची आमसभा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

उद्या गुहागर पंचायत समितीची आमसभा

९ सप्टेंबरला पाटपन्हाळे येथे; नागरिकांनी उपस्थित राहावे, विकासकामांवरील अडथळ्यांना दिलासा मिळणार

गुहागर   ( सुजित सुर्वे) :

पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची आमसभा उद्या, ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी श्री. पूजा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे होणार आहे. या आमसभेचे अध्यक्षस्थान आमदार भास्कर जाधव भूषवणार असून, तालुकावासीयांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी गुहागर यांनी केले आहे.

गुहागर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांतील अडथळे सोडविण्यासाठी आमसभा हा प्रभावी मंच मानला जातो. या बैठकीत शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित राहून थेट नागरिकांनी दिलेल्या निवेदनांना उत्तर देणार आहेत. आमदारांच्या अध्यक्षतेमुळे अधिकाऱ्यांना जबाबदार आणि ठोस उत्तरं देण्यास प्राधान्य मिळेल, ज्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२२ ऑगस्टपर्यंत पंचायत समिती कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रारी व मागण्या सादर केलेल्या नागरिकांची उपस्थिती आवश्यक आहे. तसेच आमसभेच्या दिवशीही थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार असल्याचे आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी शेखर शा. भिलारे यांनी सांगितले.

तालुक्यातील खराब व अपूर्ण रस्ते, जलजीवन मिशन योजना, पाणीपुरवठा समस्या, ग्रामपंचायतींतील अपूर्ण कामे आणि विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सभेला नागरिकांसह, शासकीय अधिकारी,सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, जिल्हापरिषद सदस्य तसेच विविध राजकीय पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत

 


🔖 हॅशटॅग्स :

#गुहागर #आमसभा #पंचायतसमिती #विकासकामे #रत्नागिरी

📸

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]