आपलं गुहागर व्यासपीठाची सभा पार पडली!

 

आपलं गुहागर व्यासपीठाची सभा पार पडली!

रस्त्यांची दुरवस्था, मोकाट गुरं व उनाड कुत्र्यांवर चर्चा; सकारात्मक निर्णय

गुहागर (प्रतिनिधी) :
“आपलं गुहागर” या वॉटसअप ग्रुपच्या वतीने आणि ॲड. संकेत साळवी यांच्या आयोजनातून दिनांक ८ सप्टेंबर रोजी ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहात सभा पार पडली. या सभेला गुहागर तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

सभेची सुरुवात संकेत साळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून केली. यानंतर गुहागर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा चर्चिला गेला. दीपक (बाबू) कनगुटकर, अमरदीप परचुरे, शार्दूल भावे, प्रदीप बेंडल साहिल आरेकर यांनी सद्यस्थिती मांडली. अमरदीप परचुरे यांनी ० ते १.८०० किमी या रस्त्याचे काम मंजूर झाल्याची व निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली. पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी प्रशासनाचा हवाला देत सांगितले.

यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न मांडण्यात आला. शृंगारतळी येथील गौरव वेल्हाळ यांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासकीय जागा ताब्यात घेऊन गुरांना निवारा द्यावा, अशी सूचना केली. करेपर्यंत हॉटेल सुरुचीचे मालक प्रथमेश दामले यांनी स्वतःची ३ एकर जागा तात्पुरती देण्याचे जाहीर केले. या जागेत गुरांची देखभाल, चारा-पाणी व वैद्यकीय सोय करण्याची जबाबदारी प्राणीप्रेमी प्रसाद (पिंट्या) जावकर यांनी स्वीकारली. याबाबत अधिकृत सूचना पुढील दोन दिवसांत जाहीर होणार आहे.

सभेत उमेश खैर यांनी मोकाट गुरांसोबतच उनाड कुत्र्यांची समस्या गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व त्यावरही उपाययोजना करण्याचे ठरले.

या बैठकीत उमेश शिंदे, संदेश कदम, मयुरेश पाटणकर, गणेश किर्वे यांसारख्या पत्रकार बांधवांनीही सहभाग घेतला. सर्व उपस्थितांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेत सकारात्मक निर्णय घेण्यात योगदान दिले.

या कार्यक्रमासाठी ज्ञानरश्मी वाचनालयाचे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर वाचनालय अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

एकंदरीत, “आपलं गुहागर” या व्यासपीठाच्या माध्यमातून गुहागरवासीय एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर विधायक चर्चा करून उपाययोजना ठरवत असल्याचे या सभेतून अधोरेखित झाले.

 

 


📌 हॅशटॅग्स :

#आपलंगुहागर #गुहागरसभा #रस्त्यांचीदुरवस्था #मोकाटगुरं #उनाडकुत्री #सामाजिकउपक्रम #RatnagiriVartahar


📸 फोटो 


 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें