नेपाळ हादरलं! माजी पंतप्रधानांच्या पत्नीला आंदोलकांनी जिवंत जाळलं; ओलींनी दिला राजीनामा

💥 नेपाळ हादरलं! माजी पंतप्रधानांच्या पत्नीला आंदोलकांनी जिवंत जाळलं; ओलींनी दिला राजीनामा

 

सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचाराविरोधात उसळलेल्या आंदोलनाने घेतला भीषण वळण; संसद, राष्ट्रपती भवनासह अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ले

 

काठमांडू:

नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाने अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे. सोशल मीडियावरील बंदी आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात उभ्या राहिलेल्या या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार यांना आंदोलकांनी घरात कोंडून आग लावली. त्या गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेने नेपाळ हादरले असून, संतप्त आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या घरासह राष्ट्रपती भवन, संसद भवन, तसेच अनेक मंत्र्यांची घरे आणि कार्यालये पेटवून दिली. विद्यमान उपपंतप्रधान बिष्णु प्रसाद पौडेल यांना आंदोलकांनी रस्त्यात मारहाण केली. मोठ्या प्रमाणावर सरकारी संपत्ती जाळली गेली असून देशात प्रचंड वित्तहानी झाली आहे.

 

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजधानी काठमांडूमध्ये हेलिकॉप्टरची लगबग दिसली. अनेक मंत्री व नेते लष्करी हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवले गेले. संतप्त नागरिकांनी हेलिकॉप्टर सेवा पुरवल्याच्या आरोपाखाली सिम्रिक एअरलाइन्सच्या इमारतीलाही आग लावली.

 

दरम्यान, जनतेच्या तीव्र रोषामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी अखेर राजीनामा दिला. आंदोलनकर्त्यांकडून काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना पुढील पंतप्रधान करण्याची जोरदार मागणी होत आहे.

 

सरकारने देशभरात कर्फ्यू लागू करून शांततेचे आवाहन केले असून, मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि चौकशीची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

 

हॅशटॅग्स

 

#NepalProtests #BreakingNews #Kathmandu #NepalCrisis #JhalanathKhanal #RajyalaxmiChitrakar #KPSharmaOli #GenZProtests

 

 

 

📸 फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें