गावाची ओढ,गावाची माती, विसरू नये – विपुल (दादा) कदम

गावाची ओढ,गावाची माती, विसरू नये – विपुल (दादा) कदम

आबलोली (संदेश कदम)
जनतेसाठी आपण शिवसेना पक्षामार्फत विकास कामे करतोय विविध उपक्रम राबवतोय आणि जे लोक कामधंदा निमित्ताने मुंबई पुणे येथे गेलेले आहेत आणि ते गणपती उत्सव शिमगोत्सव सणानिमित्त गावी येतात आणि काही क्षण अनुभवतात त्यांनी गावाची ओढ, गावाची माती विसरू नये असे आवाहन शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल (दादा)लक्ष्मण कदम यांनी शिवसेना युवा सेना यांच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले
गुहागर विधानसभा समन्वयक विपुल (दादा) लक्ष्मण कदम पुरस्कृत शिवसेना, गुहागर तालुका मर्यादित पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना विपुल (दादा) कदम पुढे म्हणाले की, प्रत्येकाला गावाची ओढ लागावी यासाठी आपण विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित आहोत.यासाठी तुमची आवड महत्त्वाची आहे. आपण राबवलेल्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेला सर्व स्पर्धकांनी मान दिलात त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो असे सांगून विपुल (दादा) कदम यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी जि.प.सदस्य सौं. नेत्रा ठाकूर यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विचार पिठावर पक्ष निरीक्षक अनुराग उतेकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर तालुका महिला प्रमुख ॲड. ज्योत्स्ना काताळकर, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, प्रदीप सुर्वे, गुहागर विधानसभा 72 गाव युवा सेना तालुकाप्रमुख विक्रांत चव्हाण, अमोल गोयथळे, ॲड. संतोष आग्रे, सागर गुजर, महेश जामसुतकर, योगेश कदम, कुणाल देसाई, सुशील जंगम आदी.मान्यवर उपस्थित होते

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें