पूर्व विदर्भातील निवडणुकांसाठी शिवसेना (UBT) सज्ज!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

✍️ पूर्व विदर्भातील निवडणुकांसाठी शिवसेना (UBT) सज्ज!

 

आ. भास्करशेठ जाधव यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक; लवकरच दौऱ्याची घोषणा

 

मुंबई – शिवसेना (UBT) नेते व आमदार भास्करशेठ जाधव यांनी पूर्व विदर्भातील पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पूर्व विदर्भातील सर्व संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

 

शिवसेना भवन, मुंबई येथे पार पडलेल्या या बैठकीत निवडणूक रणनीती, संघटन बांधणी तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर चर्चा झाली. लवकरच आ. भास्करशेठ जाधव पूर्व विदर्भाचा दौरा करून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही ठरले.

 

या वेळी पक्षाचे उपनेते विजय कदम आणि पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ उपस्थित होते.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#ShivsenaUBT #BhaskarJadhav #VidarbhaPolitics #LocalElections #ShivsenaBhavan #MaharashtraPolitics

 

 

 

📸 फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]