राहुरीत रिपब्लिकन युवा सेनेची पदाधिकारी निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

राहुरीत रिपब्लिकन युवा सेनेची पदाधिकारी निवड

 

संत गाडगेबाबा आश्रम शाळेत पार पडली बैठक; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा

 

राहुरी (नंदकुमार बागडेपातील अहिल्यानगर) :

रिपब्लिकन युवा सेनेचे सर सेनापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय आयुष किरणभाऊ घोंगडे साहेब यांच्या सूचनेनुसार बुधवार, दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी राहुरी शहरातील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळेत पदाधिकारी निवडीची बैठक उत्साहात संपन्न झाली.

बैठकीचे अध्यक्षस्थान उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव यांनी भूषविले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

 

👉 या बैठकीत खालील पदाधिकारी निवड करण्यात आले :

मा. चांगदेव कोंडीराम भिसे (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) – उपजिल्हा अध्यक्ष

सौ. सुरेखा अनिल गुंजाळ (रा. शिर्डी, ता. राहता) – महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा

कोमल संदीप बावस्कर (रा. राहता, ता. राहता) – महिला आघाडी अध्यक्षा

बाबासाहेब अशोक गायकवाड – राहता तालुका अध्यक्ष

अनिल जीवन साठे – राहुरी तालुका उपाध्यक्ष

प्रवीण शहराम गायकवाड (रा. उंबरे, ता. राहुरी) – प्रेस मीडिया तालुका अध्यक्ष

रावसाहेब अनंतराव पंडित – अपंग शहराध्यक्ष

बैठक यशस्वी करण्यासाठी पत्रकार योगेश चंद्रभान पवार यांनी अथक परिश्रम घेतले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरजी मकासरे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश पवार यांनी केले.

आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. गिरीश गायकवाड व दीपक गायकवाड (पत्रकार) यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

 

बैठकीत उत्साहाचे वातावरण असून सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#RepublicanYuvaSena #AnandrajAmbedkar #Rahuri #Ahilyanagar #RYP #AmbedkariteMovement

 

 

 

📸 फोटो

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]