दत्तदिगंबर सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

दत्तदिगंबर सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

 

मुंबई ~प्रविणभाऊ पवार 

 

मुंबई – दत्तदिगंबर सहकारी पतसंस्था मर्यादित २३ वी वार्षिक सर्वसाधारणसभा संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव गुजर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता गुदवंली म.न.पा शाळा, पहिला मजला, मांजरेकर वाडी, नटराज स्टूडीओच्या बाजूला, अंधेरी कुर्ला रोड, मुंबई येथे घेण्यात आली. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर गुजरात विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहनात आली. आपल्या भारतीय परंपरेत नुसार प्रार्थना झाल्यानंतर संस्थेचे सरचिटणीस आनंदराव जाधव यांनी सभेला सुरूवात केली.

 

संस्थेच्या २३ व्या वार्षिक सभेतील विषयांचे वाचन सुरू करुन इती इतिवृत्तान्त ते अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय असे एकूण १० विषय सभागृहात सादर केले सर्व विषयावर सुचक अनुमोदन घेऊन सभेतील विषय चांगल्याप्रकारे झाली. कोणीही सभासदांनी विरोध दर्शविला नाही. त्यानंतर सभासद प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यासाठी प्रमुख मार्गदर्शक यांनी केले. शिबीरानंतर काही पतपेढीच्या सभासद संस्थेविषयी आपले अनमोल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला आलेल्या सलेल्या प्रमुख अतिथीचे मार्गदर्शन झाल्यानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

 

संस्थेच्या वतीने उत्कृष्ट सभासद आणि दैनंदिन प्रतिनिधी यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्याच बरोबर संस्थेचे सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आले. सभा समाप्त करण्यापूर्वी राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा समाप्त झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें