श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌧️ श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर

ढगफुटी व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बातमी ~ नंदकुमार बागडेपाटील 

 

अहिल्यानगर – आज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रीरामपूर शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून हलक्या सरींचा सुरू असलेला क्रम आज अचानक वाढला.

 

हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 72 तासांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव व शेवगाव परिसरामध्ये आज ढगफुटीचा पाऊस झाला. यामुळे अनेक घरे व शेती पाण्याखाली गेली असून नागरिकांसह जनावरांचे हाल झाले आहेत.

 

जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच “अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये,” असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स

 

#श्रीरामपूर #अहिल्यानगर #पाऊस #ढगफुटी #हवामानइशारा #महाराष्ट्र

 

 

 

📷 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]