सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

💥 ब्रेकींग न्यूज 💥

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे (वय ४९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी न्यायालयात असतानाच त्यांना अचानक चक्कर आली. तत्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

शिंदे यांच्या निधनाने न्यायालयीन तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आज (मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५) सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील निवासस्थानी आणले जाणार असून दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

विधी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व

सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.

मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी असलेले शिंदे कुटुंब पुण्यात स्थायिक आहे.

सर्वोच्च न्यायालयीन निर्णय, संविधान आणि कायद्याचे बारकावे ते नेहमी सोप्या भाषेत समजावून सांगत असल्यामुळे ते लोकप्रिय झाले होते.

 

शिवसेना वादातील शिंदे विरुद्ध ठाकरे प्रकरण असो किंवा मराठा आरक्षण सुनावणी, त्यांच्या स्पष्ट आणि सोप्या मांडणीचे कौतुक होत असे.

 

परिवारावर दुःखाचा डोंगर

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांचा झालेला मृत्यू विधीक्षेत्रासाठी मोठी पोकळी निर्माण करून गेला आहे.

 

 

 

 

 

🟣 हॅशटॅग्स :

 

#BreakingNews #SiddharthShinde #SupremeCourt #Lawyer #HeartAttack #Pune #Delhi #Obitua

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें