कोकण किनाऱ्यावर चार नव्या जेट्टी प्रस्तावित 

 


🌊✨ कोकण किनाऱ्यावर चार नव्या जेट्टी प्रस्तावित

पर्यटन व मासेमारी व्यवसायाला नवे बळ

रत्नागिरी प्रतिनिधी :
पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण (एमसीझेडएमए) कडून सीआरझेड (CRZ) संदर्भात मंजुरी मिळाली आहे.

या नव्या जेटी उभारण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी (ता. राजापूर), उटंबर (ता. दापोली) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर या ठिकाणांचा समावेश आहे. हे प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत.

लवकरच या चार जेटींमुळे कोकण किनारपट्टी पुन्हा एकदा गजबजणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. याशिवाय आणखी दोन जेटींची कामे सुरू होण्याची शक्यता असल्याने एकूण सहा नवे जेटी कोकणच्या विकासाला हातभार लावणार आहेत.


📸


🔖 हॅशटॅग :

#कोकण #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #पर्यटन #मासेमारी #जेट्टी #कोकणविकास #RatnagiriVartahar


तु

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें