लाखो रुपयांच्या ऑप्टिकल फायबर केबलची तोडफोड; अज्ञातावर गुन्हा

breking news

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 लाखो रुपयांच्या ऑप्टिकल फायबर केबलची तोडफोड; अज्ञातावर गुन्हा

 

मंडणगड तालुक्यातील सावरी फाट्यावर घटना; २ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान

 

मंडणगड प्रतिनिधी – मंडणगड तालुक्यातील सावरी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने ऑप्टिकल फायबर केबलची तोडफोड करून तब्बल २ लाख १६ हजार रुपयांहून अधिक नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील तुषार अनंतराव देसले (वय ४२ वर्षे) यांनी यासंदर्भात बाणकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या मालकीची ‘एबरडेअर’ (ABERDARE) कंपनीची ३,३३१ मीटर लांबीची काळ्या रंगाची ऑप्टिकल फायबर केबल (OFC) सावरी फाटा येथे ठेवण्यात आली होती.

 

ही घटना १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने केबल ठिकठिकाणी कापून तिचे मोठे नुकसान केले असून, त्याची एकूण किंमत ₹२,१६,८८१ इतकी आहे.

 

या गंभीर प्रकाराची तक्रार १५ सप्टेंबर रोजी रात्री ८:१० वाजता पोलिसांत दाखल झाली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, गुरनं.आर.क्र. १४/२०२५ अशी नोंद झाली आहे. पुढील तपास बाणकोट पोलीस करत आहेत.

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#मंडणगड #रत्नागिरी #ऑप्टिकलफायबर #तो़डफोड #गुन्हा #बाणकोटपोलीस

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]