रत्नागिरीत अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश.नेपाली महिला अटक .

breking news

 

💥 रत्नागिरीत अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश

नेपाळी महिला पोलिसांच्या ताब्यात; पुण्यातील दोन महिलांची मुक्तता

रत्नागिरी :
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात अनैतिक व्यापार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुरुवारी मिळाली. त्यानुसार प्लॉट ई-६९, मिरजोळे एमआयडीसी येथे छापा टाकण्यात आला.

या कारवाईत एक नेपाळी नागरिक महिला पुण्यातील दोन महिलांमार्फत देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. सदर नेपाळी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करून तीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, छाप्यात मिळालेल्या दोन महिलांना अनैतिक व्यापाराच्या व्यवसायातून मुक्त करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

 

 

🔖 हॅशटॅग्स :

#रत्नागिरी #अनैतिकव्यापार #पोलिसकारवाई #देहविक्री #CrimeNews #RatnagiriNews

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें