राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र विजयी; मुंबई उपविजेता

breking news

🏏 राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र विजयी; मुंबई उपविजेता

 

रत्नागिरीच्या खेळाडूंचा मोलाचा सहभाग; आदित्य पवार सर्वोत्कृष्ट फलंदाज

lo

रत्नागिरी :-

टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे १६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या ७ वी १७ वर्षांखालील राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला.

 

महाराष्ट्र संघाच्या विजयानंतर रत्नागिरीचे गौरीज मिलिंद माळी (रत्नागिरी) व आयुष संतोष खरात (खेड, रत्नागिरी) या खेळाडूंनी विशेष योगदान दिले.

 

दरम्यान, मुंबई संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघात रत्नागिरीतील आदित्य मनोज पवार (दापोली), सुबोध संदीप मायनाक (खेड), सिद्धेश प्रदीप गोलांबडे (दापोली) या खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली.

 

विशेष म्हणजे, मुंबई संघाकडून खेळणाऱ्या आदित्य मनोज पवार (दापोली) याला संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.

 

या यशामागे भारतीय तथा महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव कुणाल हळदणकर, तसेच प्रशिक्षक व मार्गदर्शक विजय उंबरे, लखन देशमुख, सोमा बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुमित अनेराव, जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, टेक्निकल डायरेक्टर रोशन किरडवकर, मुख्य प्रशिक्षक मनोज पकये, पियुष पवार, साहिल सावंत, तसेच सल्लागार व शिक्षक मंडळींनी संघाचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

 

📸 फोट

 

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#TennisCricket #MaharashtraWin #RatnagiriPlayers #NationalChampionship #SportsNews #MumbaiTeam #AdityaPawar #RatnagiriVartah

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें