संघर्ष समिती मंडणगडची नवी कार्यकारिणी जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

संघर्ष समिती मंडणगडची नवी कार्यकारिणी जाहीर

 


 

अध्यक्षपदी अरविंद येलवे कायम; नवी मुंबईत (New Mumbai) सर्वसाधारण सभेत पदाधिकारी नियुक्त्या

 

नवी मुंबई (मंगेश जाधव):

नुकतीच संघर्ष समिती मंडणगडची सर्वसाधारण सभा पद्मा इंटरप्राईजेस येथे संघटनेचे अध्यक्ष अरविंद येलवे यांच्या अध्यक्षतेखालील उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये मागील इतीवृत्त वाचण्यात आले आणि संघटनेच्या माध्यमातून मागील काळात केलेल्या सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पुढील वाटचालीस अधिक बळ देण्यासाठी सभेमध्ये नवीन विषयानुसार कार्यकारणीत फेरबदल करून महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.

नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • अध्यक्ष: अरविंद प्रकाश येलवे
  • उपाध्यक्ष: सिकंदर अहमद बुरूड
  • सचिव: भरत दत्ताराम सरपरे
  • सहसचिव: विश्वास बाबुराव सुगदरे
  • कोषाध्यक्ष: सतिश भिकुराम जाधव
  • कार्याध्यक्ष: संकेत सुनिल तांबे
  • संघटक: अभय पिचुर्ले, सचिन धोत्रे
  • प्रसिद्धी प्रमुख: मयुरेश रजनीकांत धोत्रे
  • कायदेविषयक सल्लागार: ॲड.विराज विजय गमरे

उपस्थित सर्व मान्यवर आणि सभासद यांच्या सहकार्यातून ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


#संघर्ष_समिती_मंडणगड #पदाधिकारी_नियुक्ती #अरविंद_येलवे #नवी_मुंबई_बातमी #सामाजिक_संघटना

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]