एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची मोठी भरती प्रक्रिया

🚌 एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची मोठी भरती प्रक्रिया

२ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया; किमान ३० हजार पगार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात एसटी महामंडळात ८ हजार नवीन बसेस दाखल होणार असून, त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी तब्बल १७,४५० चालक व सहाय्यक पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी येत्या २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळणार आहे. कंत्राटी पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ३० हजार रुपये किमान मासिक वेतन तसेच एसटीकडून आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भरती प्रक्रिया राज्यातील ६ प्रादेशिक विभागांनुसार राबविण्यात येणार असून, निवड झाल्यानंतर संबंधित संस्था महामंडळाला वेळेत मनुष्यबळ उपलब्ध करून देतील.

या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, अखंडित आणि दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


📌 हॅशटॅग्स :

#STBharti #MaharashtraNews #PratapSarnaik #STDriverRecruitment #MSTRansport #EmploymentNews #BusRecruitment

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें