पूर्णगड समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

 

🌊 पूर्णगड समुद्रकिनारी स्वच्छता अभियान 🌊

 

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

रत्नागिरी :

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून पूर्णगड (ता.जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरी यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

पूर्णगड मराठी नं.१ शाळा, पूर्णगड खारवीवाडा शाळा, पूर्णगड उर्दू शाळा यांचे विद्यार्थी व शिक्षकांसह ग्रामस्थांनी किनारा परिसर स्वच्छ करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

 

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी श्री. पावसकर साहेब, गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. वासुदेव वाघे व श्री. दादा वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व सहभागींचे आभार मानत उपक्रमाची सांगता करण्यात आली.

 

 

 

📌 हॅशटॅग्स :

 

#पूर्णगड #समुद्रकिनारा #स्वच्छताअभियान #रत्नागिरी #InternationalCoastalCleanupDay #CleanBeach

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें