मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवमध्ये गोगटेच्या तन्वी सावंतने पटकावले अभिनयाचे डबल पारितोषिक.

गोगटेच्या तन्वी सावंतचे मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डबल यश

रत्नागिरी – मुंबई विद्यापीठ आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी सावंत हिने दुहेरी यश मिळवत आपली छाप उमटवली आहे. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स शाखेत शिक्षण घेत असलेल्या तनवींना हिंदी एकांकिकेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले, तर मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत विशेष कामगिरी केली.

मराठी एकपात्रीसाठी तिने *सखाराम बाईंडर* या विजय तेंडुलकरांच्या समाजजागृती करणाऱ्या नाटकातील ‘चंपा’ हे पात्र साकारत प्रेक्षकांसमोर वेगळा दृष्टिकोन मांडला. समाजाच्या विस्मृतीत गेलेल्या या पात्राच्या भावविश्वाची ताकद, तिचा निडर स्वभाव आणि चौकटीबाहेरची विचारसरणी यांचे प्रभावी चित्रण तिने रंगमंचावर सादर केले. ही नाट्यमय सादरीकरणाची संकल्पना व पुनर्लेखन वेदांग सौंदलगेकर यांचे असून मार्गदर्शन विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी केले.

या दुहेरी यशाबद्दल तन्वी सावंतचे प्राचार्य डॉ. मकरंद साकळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

—

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें