विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी येथे दुर्गा देवीच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन – भक्तांसह, तरुणाईच्या आनंदाला उधाण..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी येथे दुर्गा देवीच्या नवरात्र उत्सवाचे आयोजन – भक्तांसह, तरुणाईच्या आनंदाला उधाण..!

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दुर्गादेवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.आबलोली बाजारपेठेतील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरील पटांगणात यावर्षीही दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आबलोली गावात भक्तीमय वातावरण झाले असून नऊ – दहा दिवस दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव विविध, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जातो.दुर्गा देवीच्या नवरात्रौ उत्सवात देवीची आरती, भजनाचे कार्यक्रम, श्री. सत्यनारायण महापूजा, दांडिया रास, आरोग्य शिबीरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि हळदी कुंकू कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम,महाप्रसाद अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे भक्तांच्या आणि तरुणाईच्या आनंदाला उधाण आले आहे.

विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत रेपाळ, उपाध्यक्ष रवींद्र रेपाळ, सचिव अजित रेपाळ, खजिनदार प्रशांत नेटके, सदस्य नरेश निमुणकर, प्रथमेश निमुणकर, नितेश निमुणकर, रुशिल निमुणकर,योगेश रेपाळ, स्वप्निल रेपाळ, अतिश रेपाळ, शरद उकार्डे, शरद लांडे, राजेश तोडकरी, धनराज गुरसळे, नकुल भंडारी, वैभव नेटके, सत्यम गुरसळे, प्रसाद नेटके, विशाल लोकरे,विशाल नेटके, अक्षय निमुणकर, गणेश महाडिक, शैलेश दिंडे, ऋषिकेश बाईत, सुरज रेडेकर आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते दुर्गा देवीचा नवरात्रौ उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]