कोण कोणाशी युती करतंय याची चिंता करू नका; त्यांची गणितं आपल्याकडेच – एकनाथ शिंदे

ratnagiri vartahar eknath shinde news

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

💥 कोण कोणाशी युती करतंय याची चिंता करू नका; त्यांची गणितं आपल्याकडेच – एकनाथ शिंदे

🟣 पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट कानमंत्र दिला. “कोण कोणाशी युती करतंय याची चिंता नका, त्यांची सगळी गणितं आपल्याकडे आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.

पालिका निवडणुकीत पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, याची खात्री असल्याचं शिंदेंनी सांगितलं. शाखाप्रमुख आणि गटप्रमुख यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली असून “जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागण्यात येतील” असंही ठरल्याची माहिती आहे.

शिंदे म्हणाले की, “हा पक्ष नोकर-मालकाचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. संकट दिसलं की धावून जा, शेतकऱ्यांना मदत करा. शिस्त ही शिस्त आहे, ‘शिवसेना’ या नावाला गालबोट लागता कामा नये.”

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने गर्दी करण्याचं आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे – एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “त्यांच्या युतीची चिंता नका, आपल्याकडे सर्व गणितं आहेत.”

 

 


🔖 हॅशटॅग्स :

#EknathShinde #ShivSena #MumbaiElections #BMC2025 #Politics #Maharashtra


📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]