संस्थापक अध्यक्ष बालाजी घुमाडे यांच्या उपस्थितीत पुण्यात बहुजन जनता पक्षाची भव्य बैठक पार

संस्थापक अध्यक्ष बालाजी घुमाडे यांच्या उपस्थितीत पुण्यात बहुजन जनता पक्षाची भव्य बैठक पार

 

पुणे (दि. 05 ऑक्टोबर 2025) — बहुजन जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यात उत्साहात पार पडली. या बैठकीस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री बालाजी घुमाडे साहेब, तसेच वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार मा. श्री बापुसाहेब पठारे (शरद पवार गट) आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पुणे शहराध्यक्ष मा. श्री शशी आण्णा टेंगरे प्रमुख उपस्थित होते.

 

बैठकीस मराठवाडा अध्यक्ष श्री मोटे आण्णा, युवा प्रदेशाध्यक्ष डॉ. अभिमान कांबळे, प्रदेशाध्यक्ष श्री राजुभाई थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष योगेश लोंढे, पुणे शहर अध्यक्ष तातेराव लोंढे, तसेच संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री सुखदेव खाजेकर, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री सुनील रोकडे, बीड जिल्हा अध्यक्ष श्री खुडे साहेब, कोर कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उपाध्यक्ष आण्णासाहेब सरोदे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्री विकास गायकवाड, वैजापूर तालुका अध्यक्ष बबन सौदागर यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

या वेळी आण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह बहुजन जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश संस्थापक अध्यक्ष मा. श्री बालाजी घुमाडे साहेब आणि मोटे आण्णा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

 

बैठकीत अजूनही अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन जनता पक्षात प्रवेश केला असून, पक्ष महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे.

या प्रसंगी आमदार बापुसाहेब पठारे, मा. बालाजी घुमाडे, आणि मोटे आण्णा यांनी प्रभावी भाषण करत गोरगरिब, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या न्यायासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

 

त्यांनी समाजाला लुटणाऱ्या संघटनांना विरोध करून, बहुजन जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

 

#बहुजनजनतापक्ष #बालाजीघुमाडे #पुणे #राजकारण #पक्षप्रवेश #बापुसाहेबपठारे #मोटेआण्णा #अजितदादापवारगट #पक्षवाढ #महाराष्ट्रराजकारण

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें