शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी — गुहागर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे आंदोलन

🚩 शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी — गुहागर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे आंदोलन 🚩

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता तहसीलदारांना निवेदन देणार — तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

गुहागर (सुजित सुर्वे, प्रतिनिधी)

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

 

या आंदोलनात तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शहर प्रमुख (गुहागर व शृंगारतळी) व त्यांचे पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत सेलचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

हे आवाहन शिवसेना ( UBT)  गुहागर तालुकाप्रमुख सचिन चंद्रकांत बाईत यांनी केले असून, शिवसेना UBT  च्वया तीने रा ज्यभर एकसंधपणे हे आंदोलन राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

ठिकाण: गुहागर तहसीलदार कार्यालय

 

 

 

#शिवसेना #गुहागर #शेतकरीनुकसान #नुकसानभरपाई #उद्धवठाकरे #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #SachinBait #RatnagiriNews #RatnagiriVartahar

 

 

 

📸

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें