धक्कादायक घटना! नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याचा खून

💥धक्कादायक घटना! नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याचा खून💥

 

🔹नागपूरमध्ये प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा निर्घृण खून — पोलिस तपास सुरु🔹

 

नागपुर ~नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील कलाकार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा ७ ऑक्टोबर रोजी निर्घृण खून करण्यात आला. ही घटना नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन परिसरात घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू छत्रीला तारांनी बांधून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. चाकूने वार झाल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तरीही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केली असता अर्धनग्न अवस्थेत तार गुंडाळलेले त्याचे शरीर सापडले. प्राथमिक तपासानुसार, बाबू छत्रीचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर नागपूर पोलीस ठाण्यात मारामारी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते.

 

विशेष म्हणजे, नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांना योग्य मार्गावर आणण्याचा संदेश देण्यात आला होता, आणि बाबू छत्रीने त्यात अशाच एका युवकाची भूमिका साकारली होती.

 

या प्रकरणात ध्रुव साहू नावाच्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी लवकरच सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले आहे.

 

 

 

#नागराजमंजुळे #झुंडचित्रपट #प्रियांशुछत्री #बाबूछत्री #नागपूरखूनप्रकरण #मराठीबातमी #RatnagiriVartahar

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें