सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेने केला जाहीर निषेध

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेने केला जाहीर निषेध

आबलोली (संदेश कदम )

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारोप समारंभात दुसऱ्या सत्रात बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ व चर्चासत्र समारंभाचे आयोजन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून भ्याड हल्ला करणारा आरोपी राकेश किशोर या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि त्याची सनद कायमची रद्द करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली

यावेळी बौद्धजन सहकारी संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश(दादा) सावंत, चेअरमन एम.डी. मोहिते, उपाध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनील गमरे, सह. चिटणीस दिलीप मोहिते, अध्यक्ष वसंत कदम, विश्वस्त शंकर मोहिते, मनीष गमरे, पराग सावंत, बौद्धजन सहकारी संघ संघटनेचे हिशोब तपासणीस अविनाश कदम,अंतर्गत धार्मिक संस्कार अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुभाष जाधव, रवींद्र पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी – वैभव गमरे (गुहागर), राकेश पवार( पेवे ), मनोज गमरे (गिमवी), सुरेश जाधव (वेळंब), प्रभाकर मोहिते (पिंपर), सचिन पवार( शीर ), विनोद यादव (कुडली) आदी.पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपासक – उपासिका, बौद्ध बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव यांनी केले.तर आभार राकेश पवार यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें