उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती.

 

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने  शिवसेना (UBT) पक्ष चे वतीने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव नियुक्ती.नियुक्ती जाहीर

 

गुहागर (सुजित सुर्वे प्रतिनिधी) :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी कामगिरी बजावली आहे.

 

या नियुक्तीची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरत असून जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रभाव उत्तर रत्नागिरी विभागात आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

मा. विक्रांत जाधव यांच्या निवडीबद्दल गुहागर तालुक्यातून आमदार भास्कर जाधव, समन्वयक विनायक मुळे, तालुकाप्रमुख सचिन वाईत, पडवे जि.प. गटाचे पंचायत समिती सदस्य रवी आंबेकर, जयदेव मोरे,  समीर गडदे,जगदीश गडदे, पत्रकार संदेश कदम, सुजित सुर्वे,  आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

 

 

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#शिवसेना #विक्रांतजाधव #उद्धवठाकरे #रत्नागिरी #गुहागर #RatnagiriNews #ShivsenaUpdates #MaharashtraPolitics #RatnagiriVartahar

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]