लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी वेबसाईट ठप्प; महिलांचे हाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी वेबसाईट ठप्प; महिलांचे हाल

नवीमुंबई (मंगेश जाधव)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत आता ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या कायम असून, यामुळे लाभार्थी महिलांना सीएससी सेंटरवर जाऊन तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे.

 

आधार कार्ड अपडेटसाठी आधीच या केंद्रांवर गर्दी असताना, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना वेळ आणि श्रम दोन्ही खर्ची पडत आहेत.

 

महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ई-केवायसीसाठी शासनाने अद्याप कोणताही पर्यायी पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे अनेक महिलांनी ही प्रक्रिया सध्या थांबवून ठेवली आहे.

 

जिल्ह्यात तब्बल ४ लाख ७४ हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून, त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईट अनेकदा बंद पडते. ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव असल्याने ही अडचण अधिकच गंभीर झाली आहे.

 

शहरातील सीएससी सेंटरवर महिलांच्या लांबलचक रांगा दिसून येत आहेत. आधार अपडेशन आणि ई-केवायसी या दोन्ही कामांमुळे सेंटरवर गोंधळ आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

लाभार्थी विनया तोस्कर यांनी सांगितले, “गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवरून ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण वेबसाईटच सुरू होत नाही. घरकाम आणि नोकरी सांभाळून शहरात जाऊन रांगेत उभं राहणं कठीण होतंय.”

 

दरम्यान, महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी पाटणकर यांनी सांगितले, “ई-केवायसी प्रक्रिया सर्व महिलांसाठी आवश्यक आहे. मात्र संकेतस्थळ कार्यरत नसल्यास काय करावे, याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना किंवा पर्यायी उपाययोजना मिळालेल्या नाहीत.”

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]