डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, मुंबई ( काजुर्ली ) तर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ संपन्न …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, मुंबई ( काजुर्ली ) तर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ संपन्न …

गुहागर ~ गुहागर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, मुंबई ( काजुर्ली ) यांच्यावतीने ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त यांचा सत्कार समारंभ नाडकर्णी पार्क वडाळा येथे
राजेंद्र यशवंत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी आणि सेवापूर्ती, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शैलेंद्र मोहिते हे प्रमुख मार्गदर्शक आणि बौद्धाचार्य प्रमोद मोहिते हे उपस्थित होते.
धम्मसंस्कार विधीने कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यानंतर महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व धम्म उपासक, उपासिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इ.१० वी मध्ये उत्तीर्ण झालेले निखिल प्र.मोहिते, ईशा मोहिते, अथर्व मोहिते,भावेश मोहिते,सांची मोहिते तसेच १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेले प्रफुल्ल सं.मोहिते, प्रेरणा मोहिते, श्रावणी मोहिते, प्रांजल मोहिते, तसेच पदवीधर मध्ये अदिती मोहिते, प्रबुद्धी मोहिते,रोशनी मोहिते, प्रफुल्ल दि.मोहिते, प्रगती मोहिते,
साक्षी मोहिते (MBA), या सर्व गुणवंतांचा बॅग आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्ती झालेले अमोल मोहिते,प्रमोद मोहिते, अरुण मोहिते,विजय मोहिते, संतोष मोहिते, विश्वास मोहिते हे उपस्थित होते त्यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ मार्गदर्शक सिताराम मोहिते,गणपत मोहिते,सखाराम मोहिते, गंगाराम मोहिते,दत्ताराम पवार,प्रदीप मोहिते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच,मुंबई चे सर्व पदाधिकारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे,समाजाचे, देशाचे नाव उंचवावे.आणि आपला सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक शैलेंद्र मोहिते यांनी केले.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजेंद्र पवार आणि अमरनाथ मोहिते यांनी केले.

 

बातमीचा स्रोत – राज पवार गुहागर

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें