श्री. निलेश सांबरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याला श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय देऊन लाखो रत्नागिरी करांच्या जीवनात आशेचा दीप लावला

highlits

श्री. निलेश सांबरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याला श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय देऊन लाखो रत्नागिरी करांच्या जीवनात आशेचा दीप लावला

आबलोली (संदेश कदम)

रत्नागिरी जिल्ह्यात एक काळ असा होता, जेव्हा रुग्णालय म्हणजे भीती, चिंता आणि खर्चाचं दुसरं नाव होतं. रुग्णांची रांग, औषधांच्या बिलांची चिंता आणि मनात सतत एक प्रश्न — “उपचार परवडतील का?”

पण मग एक दिवस सगळं बदललं.
श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय श्री निलेश सांबरे यांच्या माध्यमाजून उभारलं गेलं, आणि त्या दारातून आत पाऊल टाकताच वातावरणच बदललं. इथे भीती नाही, फक्त विश्वास आहे. खर्चाची चिंता नाही, फक्त मायेचं आश्वासन आहे. प्रत्येक रुग्णाला उपचारासोबत सन्मान, प्रत्येक चेहऱ्यावर हसू आणि प्रत्येक नजरेत समाधान दिसू लागलं.

आता रुग्णालय म्हणजे फक्त उपचाराचं ठिकाण नाही — तर आशेचं, प्रेमाचं आणि सेवाभावाचं केंद्र बनलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला असे मोफत रुग्णालय देऊन लाखो रत्नागिरी करांचा जिवनात आशेचा दिप लावणारा निलेश सांबरे यांना रत्नागिरीतील लाखो माय – बाप जनते कडून विशेष करुन गरीबातील गरीब रुग्ण जनतेकडून दिपावलीच्या आशीर्वाद रुपी हार्दीक शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात येत आहेत

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें