चव्हाणवाडी गावचे सुपुत्र कुमार वेद विकास बाणे याची रत्नागिरी जिल्हा संघामध्ये निवड

चव्हाणवाडी गावचे सुपुत्र कुमार वेद विकास बाणे याची रत्नागिरी जिल्हा संघामध्ये निवड

चव्हाणवाडी( श्री मनोहर धुरी)

राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हानवाडी गावातील माजी पोलीस पाटील कै मारुती बाणे यांचे नातू कुमार वेद विकास बाणे याची पुणे येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील लेदर बॉल स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे यामुळे याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे रत्नागिरी जिल्ह्यांतून सुमारे दीडशे ते दोनशे गुणवान खेळाडूंनी या निवड प्रक्रियेत भाग घेतला होता या गुणवंत खेळाडूंमधून अंतिम संघामधील खेळाडूंची निवड करण्यात आली यामध्ये वेद विकास बाणे यांची निवड झाली रत्नागिरीतील नामवंत अकॅडमी असणाऱ्या कै छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी मध्ये कुमार वेद बाणे प्रशिक्षण घेत आहे अकॅडमी कडून दिल्या जात असलेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचा या यशात खूप मोलाचा वाटा आहे या अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतलेले दर्जेदार खेळाडू महाराष्ट्रासाठी खेळत आहेत आणि भविष्यातही प्रतिभावंत खेळाडू या अकॅडमीतुन घडतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे आज वेद ची जिल्हा संघा मध्ये अष्टपैलू म्हणून निवड झाली आहे कुमार वेद बाणे चा क्रिकेट मधील राजा विराट कोहली हा आदर्श आहे भविष्यात त्याला क्रिकेट मध्ये ऑल राउंडर म्हणूनच प्रगती करायची आहे असे तो म्हणाला आज त्याच्या गोंलंदाजी चा वेग 100 ते 105 किमी आहे असे समजते

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें