सावर्डेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

🟧 सावर्डेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

 

भव्य उत्साहात पार पडला उद्घाटन सोहळा; पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

 

आबलोली (प्रतिनिधी – संदेश कदम):

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सावर्डे विभागीय कार्यालयाचे भव्य उद्घाटन शनिवारी उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे लोकार्पण शिवसेना नेते व आमदार भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.

 

आमदार भास्करशेठ जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील संघटनात्मक कामकाजासाठी मार्गदर्शन केले. “सावर्डेतील नव्या कार्यालयातून पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि जनसेवेचा नवा अध्याय सुरू होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कार्यक्रमास तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, उपतालुकाप्रमुख संदीप राणे, सचिन शेट्ये, राजाभाऊ नारकर, चिपळूण शहरप्रमुख भैया कदम, सावर्डे विभागप्रमुख सागर सावंत, मांडकी विभागप्रमुख रमेश कुंभार, असुर्डे विभागप्रमुख अजित गुजर, माजी जि.प. सदस्य संतोष चव्हाण, माजी प.स. सदस्य सुभाष जाधव, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, क्षेत्राध्यक्षा रुमाताई देवळेकर, शहर सचिव प्रशांत मुळ्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच ज्येष्ठ शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी आणि सावर्डे विभागातील विविध पदाधिकारी – बाळशेठ पंडित, सुशिल सावंत, सुनिल जाधव, संजय कोकाटे, राजेशिर्के, अकलाख शेख, राजू गुरव, दत्ता उदेग, सुनिल गुरव, विष्णू चव्हाण, सुरेश वाघे, फैसल कास्कर, सचिन चोरगे, उमेश खताते, मानसी भोसले, पार्थ जागुष्टे, शिवानी कासार, रमेश राजेशिर्के, संदीप चव्हाण, फैय्याज शिरळकर, सुभाष राडे, विवेक सुर्वे, नयन कुळे, कृष्णा (नाना) हुमणे, तेजस घाणेकर, निलेश डिके, अमोल पिरधनकर, रुपेश घाग, मयूर घाग, निलेश भुवड, भूपेश सावर्डेकर, धनराज वरेकर, विशाल परकर, बारकू बुआ, दिलीप घाग, बाबू भुवड आदींची उपस्थिती लाभली.

 

या कार्यक्रमाला ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून शिवसेनेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

 

 

 

 

🏷️ हॅशटॅग्स:

 

#ShivSenaUBT #BhaskarJadhav #Sawarde #Chiplun #RatnagiriNews #ShivSenaOffice #UddhavThackeray #RatnagiriVartahar

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें