लांज्यात फळपीक विमा योजनेच्या पोस्टरचे अनावरण; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

highlits

लांज्यात फळपीक विमा योजनेच्या पोस्टरचे अनावरण; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

 

हवामान आधारित फळ पीक विमा योजना २०२५-२६ लाभदायक ठरणार – कृषी विभाग

 

लांजा (जितेंद्र चव्हाण,प्रतिनिधी) – लांजा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, बँक व महा ई-सेवा केंद्र यांच्या माध्यमातून पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना २०२५-२६ या योजनेच्या प्रसारित पोस्टरचे अनावरण करण्यात आले. भारतीय विमा कंपनी (AIC) द्वारे राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणारी ठरणार आहे.

 

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. ए. एस. शेलार, महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक श्री. गणेश व्यव्हाने, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी श्री. पी. जाधव, श्रीमती के. कांबळे तसेच भारतीय विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री. तेजस लांजेकर उपस्थित होते.

 

कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, या योजनेचा लाभ घेऊन आपल्या फळपिकांचे संरक्षण करावे आणि आगामी हंगामात या विमा योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#लांजा #फळपीकविमा #AIC #हवामानआधारितविमा #कृषिविभाग #रत्नागिरीवार्ताहर

 

📸 फोट

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें