संकटसमयी पाठीशी राहिल्याबद्दल वेलदूर नवानगर ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता पूर्वक आभार

संकटसमयी पाठीशी राहिल्याबद्दल वेलदूर नवानगर ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता पूर्वक आभार

गुहागर ~  करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नौका क्र. IND-MH-07-MM-4376 (चंद्राई) आणि IND-MH-07-MM-3599 (गावदेवी मरीन) या नौकांवरील एकूण ३५ मच्छीमार बांधव हे दिनांक २६.१०.२०२५ ते ३१.१०.२०२५ पर्यंत जवळजवळ सात दिवस चक्रीवादळाच्या तांडवात अरबीसमुद्रात अडकून बेपत्ता झाले होते.
या कठीण प्रसंगी, जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करून आपल्या मच्छीमार बांधवांना सुखरूप किनाऱ्यावर आणणाऱ्या सर्व बचावदलांचे, स्थानिक प्रशासनाचे, इंडियन कोस्ट गार्ड विभागाचे, फिशरीज विभागाचे, तसेच समुद्रावर कार्यरत सर्व खलाशी वर्ग, तांडेल, तरुण कार्यकर्ते, आणि अखिल महाराष्ट्र कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष यांचे मनःपूर्वक आभार.
याचबरोबर करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन, सभासद व नाखवा संघ, तसेच नवानगर मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन, सभासद, सदस्य, आणि वेळप्रसंगी धाऊन जाऊन मदत करणारे नवानगर गावातील सर्व कार्यकर्ते — या सर्वांची तत्परता व सेवाभाव खरोखर प्रेरणादायी आहे.
आपत्तीच्या काळात खारवी समाजातील गावाकडील व मुंबईतील सर्व स्तरातील समाजबंधूंनी दाखवलेली एकता, जिद्द आणि परस्पर मदतीची भावना ही आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
विशेष आभार, वेळप्रसंगी मच्छीमारांच्या सेवेसाठी सदैव  तत्पर, मच्छीमारांचे अनेक प्रश्न मार्गी लावणारे व सदर विषयाची गांभीर्यता ओळखून तातडीने मच्छीमारांच्या मदतीसाठी मुंबईकडे रवाना होणारे गुहागर तालुक्याचे कार्यसम्राट, विद्यमान आमदार सन्माननीय भास्करशेठ जाधव साहेब आणि संसदीय केंद्रीय मंत्री सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब व उरणचे स्थानिक आमदार सन्मा. महेशची बांध साहेब यांचे, ज्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे बचावकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडले. यांचेही खूप खूप मनःपूर्वक आभार.
आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमांमुळे आज अनेक जीव वाचले — हीच खरी सेवा, आणि हीच खरी मानवी एकता! पाऊस, वारा, थंडी, थकवा — सर्व काही विसरून केलेल्या या सेवेसाठी आपण सारेच ऋणी आहोत. मनःपूर्वक आभार आणि सलाम या एकतेला, धैर्याला आणि समर्पणाला!
समुद्राच्या अथांग लाटांप्रमाणेच आपल्या एकतेची शक्ती सदैव अमर राहो! 🌊🙏
– नवानगर मच्छीमार सहकारी सोसायटी,
तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ
नवानगर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें