एसटी महामंडळाच्या जागांवर ‘पेट्रो–मोटेल हब’ उभारणी; रिटेल इंधन विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू!

 

एसटी महामंडळाच्या जागांवर ‘पेट्रो–मोटेल हब’ उभारणी; रिटेल इंधन विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू!

 

राज्यभरातील २५० ठिकाणी पेट्रोल–डिझेल–सीएनजी विक्रीबरोबरच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन; उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न.

 

📍 मुंबई:

उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता व्यावसायिक क्षेत्रात पाऊल टाकत आहे. राज्यभरात एसटी महामंडळाच्या स्वतःच्या जागांवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी ‘पेट्रो–मोटेल हब’ उभारले जाणार असून, येथे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटसह रिटेल विक्री केंद्र सुरू होणार आहेत. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

मुख्यालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असून, केवळ प्रवासी तिकीट महसुलावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे नव्या उत्पन्न स्रोतांची गरज आहे. गेल्या ७० वर्षांपासून एसटी महामंडळ इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियमकडून इंधन खरेदी करत आहे. सध्या महामंडळाच्या २५१ ठिकाणी डिझेल वितरण केंद्रे आहेत. त्यामुळे इंधन विक्रीचा अनुभव असलेल्या एसटीसाठी व्यावसायिक विक्री केंद्र उभारणे सोपे होईल, असे ते म्हणाले.

 

या उपक्रमाअंतर्गत राज्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०x३० मीटर क्षेत्र राखीव ठेवले जाणार आहे. येथे इंधन विक्रीबरोबर रिटेल शॉप व इतर व्यावसायिक उपक्रमांना देखील चालना मिळेल. सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून एसटी महामंडळाला मोठा महसूल मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

सरनाईक यांनी सांगितले की, खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम तसेच आंतरराष्ट्रीय इंधन कंपन्यांनाही सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या केंद्रांवर एसटी बसेससाठी इंधन भरण्याची सोय तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ विक्री दोन्ही उपलब्ध असतील.

 

“एसटी महामंडळाच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र उपलब्ध होणार असून, महामंडळालाही नवा महसूल स्रोत मिळेल,” असे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.

 

 

—

 

🔖 हॅशटॅग्स:

#एसटीमहामंडळ #PetroMotelHub #PratapSarnaik #इंधनविक्री #STMahmandal #CNGStation #ElectricCharging #PublicPrivatePartnership #MaharashtraNews #TransportationDevelopment

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें