Ratnagiri Breaking- मुलीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा पदाचा राजीनामा

rtn

🔥 लेकीसाठी राजकीय त्याग! 🔥

Ratnagiri Breaking- मुलीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा पदाचा राजीनामा

रत्नागिरी: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूणमधील एका भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

या राजीनाम्यामागील कारण राजकीय त्याग आणि कौटुंबिक निष्ठा असल्याची माहिती समोर येत आहे. राजेश सावंत यांची मुलगी शिवानी माने यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून रत्नागिरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लेकीच्या नगराध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठीच, राजकीय मूल्यांची जपवणूक करत, राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

‘लेकीसाठी बापाने राजकीय करिअरवर पाणी सोडले,’ अशी चर्चा सध्या रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.

भाजपमध्ये राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीची महत्त्वाची जबाबदारी होती. मात्र, पक्षातील जबाबदारी आणि मुलीची उमेदवारी यात राजकीय पेच निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

शिवानी माने या ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते बाळ माने यांच्या सून आहेत. येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी त्या इच्छुक असून, ठाकरे गटातून त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा एक प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जात आहे.


 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें