पारगाव सुद्रिक गणातून नंदकुमार बगाडे पाटील यांची उमेदवारी निश्चित! हिंदू एकता आंदोलन पक्षाचा पाठिंबा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

पारगाव सुद्रिक गणातून नंदकुमार बगाडे पाटील यांची उमेदवारी निश्चित! हिंदू एकता आंदोलन पक्षाचा पाठिंबा

श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा पंचायत समितीच्या पारगाव सुद्रिक गणातून ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बगाडे पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली असून, हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने ते रिंगणात उतरणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी बगाडे यांच्या उमेदवारीला आपला अधिकृत पाठिंबा दिला आहे.

नंदकुमार बगाडे हे गेली चार दशके पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असून, त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात नाव कमावले आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या ठामपणे मांडल्या आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि जनतेला शासकीय योजनांचे फायदे मिळवून देणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांनी पारगाव सुद्रिक व परिसरात मोफत नेत्रतपासणी शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, तसेच अंध, अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले. तसेच क्रिकेट स्पर्धा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

त्यांच्या पुढाकाराने श्रीगोंदा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक एकाच वेळी पारगाव सुद्रिक येथे कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते — हे गावासाठी अभिमानास्पद ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाला राज्यभरात वेगळी ओळख मिळाली आहे.

हिंदू एकता आंदोलन पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला राष्ट्रीय निवडणूक आयोगाची मान्यता आहे. पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, बगाडे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहेत.

बगाडे पाटील म्हणाले, “निवडणूक जिंकू किंवा हरू, पण माघार नाही. पक्षावर विश्वास ठेवून जनतेसाठी काम करत राहणार आहे.”

पारगाव सुद्रिक, वडळी, सुरुडी, खामकरवाडी, घारगाव व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणुकीत खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]