रत्नागिरीत नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक प्रचारावर निर्बंध खासगी जागा, भिंती, इमारतीवर परवानगीशिवाय पोस्टर-फ्लेक्स लावल्यास कारवाई

VOTER ID

रत्नागिरीत नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक प्रचारावर निर्बंध

खासगी जागा, भिंती, इमारतीवर परवानगीशिवाय पोस्टर-फ्लेक्स लावल्यास कारवाई

 

रत्नागिरी :

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक प्रचारावर काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणी मालकाची परवानगी व परवाना प्राधिकरणाची मंजुरी शिवाय पोस्टर, भित्तीपत्रक, झेंडे, प्रचार फलक, स्लोगन इत्यादी लावता येणार नाहीत.

 

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. आचारसंहिता कालावधीत परवानगीशिवाय जाहिरात किंवा प्रचार साहित्य लावणे हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा 1995 अंतर्गत दंडनीय ठरेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

 

प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेस स्वतंत्रपणे आदेशाची तामील करणे शक्य नसल्यामुळे पोलिस यंत्रणेकडून हा आदेश ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करावा तसेच प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

या आदेशामुळे बेकायदेशीर पोस्टरबाजी, बॅनरबाजी आणि सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे विद्रुपीकरण रोखले जाणार असून निवडणूक प्रचार कायदेशीर चौकटीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें