बावीस खेडी बौद्धजन संघातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

बावीस खेडी बौद्धजन संघातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

आबलोली

बावीस खेडी बौद्धजन संघ,विभाग मुंबई यांच्या वतीने संस्थेअंतर्गत सदस्य गावातील मुंबई येथे वास्तव्य करणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सांताक्रूझ पूर्व या ठिकाणी आज दिनांक ०९/११/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आणि पदविका व पदवी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत गौरवण्यात येणार आहे.

तरी या गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें