ऍस्क्लेपिअस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चिपळूण येथे ११ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

ऍस्क्लेपिअस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चिपळूण येथे ११ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम)

ऍस्क्लेपिअस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा चिपळूण

येथे ११ वा वर्धापन दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी चिपळूण येथील काणे हॉल येथे ऍस्क्लेपिअस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या आयुर्वेदिक औषधे व घरगुती वस्तू देणारी ही कंपनी ११ वर्षाची झाली असून या कंपनीचा ११ वा वर्धापन दिन चिपळूण येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी चिपळूण मधील कंपनीचे सफायर लिडर तुषार कदम, खेड येथील कंपनीच्या टोपाझ लिडर सौ. वृंदा भोसले, गुहागर येथील कंपनीच्या एमरोल्ड लिडर सौ. अश्विनी नाटुस्कर , खेड येथील कंपनीचे एमरोल्ड लिडर प्रविण राजेशिर्के यांनी ११ वर्षाची वाटचाल आणि विवीध आयुर्वेदिक औषधांची मौलिक माहिती दिली आणि त्यापासून मिळणारा नफा याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत कंपनीच्या टोपाझ लिडर सौ. वृंदा भोसले यांच्या हस्ते केक कापून कंपनीचा ११ वा वर्धापनदिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर, चिपळूण, खेड तालुक्यातील कंपनीचे हितचिंतक महिला-पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें