एनसीसीच्या कोकण विजय26 सागर नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड नं.1 शाळेत विविध ऍक्टिव्हिटी 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एनसीसीच्या कोकण विजय 26 सागर नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत पूर्णगड नं.1 शाळेत विविध ऍक्टिव्हिटी

रत्नागिरी ~
महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिट तर्फे कोकण विजय 26 सागरी नौका भ्रमण मोहिमेअंतर्गत जि. प .शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत विविध ऍक्टिव्हिटी सादर केल्या.
या ऍक्टिव्हिटी मध्ये स्वच्छ ,सुंदर, समृद्ध कोकण यावर आधारित उत्तम अशाप्रकारचे पथनाट्य सादर केले व जनजागृती केली. तद्नंतर रॅली काढून पर्यावरण जागृती करण्यात आली. विद्यार्थी वर्गाला भविष्यामध्ये संघभावना, शिस्त, साहसीवृत्ती याविषयी माहिती माहिती दिली. शिडाची जहाजे, विविध बोटी यांचे कार्य कसे चालते याची माहिती उत्तम प्रकारे दिली.
उपस्थित सर्व अधिकारी, एनसीसी कॅडेट यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी केले व संपूर्ण टीमला धन्यवाद देण्यात आले.शाळेच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण बीट विस्तार अधिकारी पावस आदरणीय हिरवे मॅडम, केंद्रप्रमुख श्री संजय राणे सर यांनी समाधान व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]