मंडणगड येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश; रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मंडणगड येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश; रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

🚩 सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ! 🚩

दापोली : मा. शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम आणि मा. नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दापोली तालुक्यातील कात्रण, पोफळवणे, वावघर आणि दमामे बौद्धवाडी येथील तमाम ग्रामस्थांनी श्री. फरामानभाई बटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम मंडणगड येथील निवासस्थानी संपन्न झाला.

 

कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकोपा जपत गावागावांचा, वाड्यांचा आणि मोहल्ल्यांचा विकास करणे ही आमची जबाबदारी असल्याचे वक्तव्य करण्यात आले. जसा विकास मा. शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वात गेली अनेक वर्षे झाला आहे, तसाच विकास मंत्री म्हणून मतदारसंघात होईल, अशी ग्वाही उपस्थितांना देण्यात आली.

 

या प्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, कात्रण गावचे सरपंच अमोल मळेकर, माजी जिल्हानियोजन सदस्य प्रभाकर गोलाबडे, कातळवाडी अध्यक्ष परशुराम मळेकर, पोफळवणेचे बदरुद्दीन खोत, दमामे बौद्धवाडीचे महादेव सावंत आणि सुरेश सावंत, तसेच वावघर मोहल्ला अध्यक्ष सिराजभाई चिकटे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें