आबलोली येथे ग्रामसभेत नितीन कोल्हापुरे यांचे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना या विषयावर मौलिक मार्गदर्शन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे ग्रामसभेत नितीन कोल्हापुरे यांचे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना या विषयावर मौलिक मार्गदर्शन उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे नियोजन करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आज निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ग्रामसभेला मार्गदर्शन करण्यासाठी अरिहंत सर्विसेस सावर्डे यांचे मालक नितीन कोल्हापूरे हे आबलोली येथे आले होते.नितीन कोल्हापूरे यांनी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना या संदर्भात आबलोली येथील ग्रामस्थांना मौलिक मार्गदर्शन करताना आपण घरचे लाईट बिल घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून कसे शून्य करू शकतो तसेच यातून पैशाची बचत कशी होईल व हे पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून आपल्याला किती अर्थसाह्य केलं जातं यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, तलाठी विनोद जोशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. वृषाली वैद्य, ऋषिकेश बाईत,श्रीमती. नम्रता निमुणकर, सौ. पायल गोणबरे,सौ.रुपाली कदम,संजय कदम, बचत गटाच्या सीआरपी सौ. मिनल कदम, अंगणवाडी सेविका सौ. रिया रेपाळ, सौ.प्रिया कदम, सौ. मैथिली भाटकर, सौ. सानिध्या रेपाळ, आशा सेविका सौ. विशाखा कदम, ग्रामस्थ अनंत पागडे, दत्ताराम कदम, कृष्णा उकार्डे, सुमित पवार आदी. उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]