दिल्ली स्फोट प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा कडक; समुद्रकिनारी व सार्वजनिक ठिकाणी गस्ती वाढवली

📰 दिल्ली स्फोट प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा कडक; समुद्रकिनारी व सार्वजनिक ठिकाणी गस्ती वाढवली

लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटानंतर रत्नागिरी पोलिसांची जिल्हाभर उच्चस्तरीय सतर्कता, तपासणी नाक्यांवर कसून चौकशी


रत्नागिरी :

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटात 13 जणांचा मृत्यू व 20 पेक्षा अधिक जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा उपाययोजना मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. संभाव्य धोक्याचा विचार करून रत्नागिरी पोलीस दलाने जिल्ह्यात उच्चस्तरीय सतर्कता जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील समुद्रकिनारे, संवेदनशील भाग, बाजारपेठा, बस-रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे, बंदरे, जेट्टी व लँडिंग पॉईंट्स येथे कडक गस्त, तपासणी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आल्या आहेत.

BDDS व स्निफर डॉग्सचा वापर

स्थानिक पोलीस ठाणे, बॉम्ब शोध व नाश पथक (BDDS) आणि प्रशिक्षित स्निफर डॉग्स यांच्याकडून संशयास्पद वस्तू, वाहने व व्यक्तींची तपासणी सुरू आहे.
समुद्र मार्गावरून येणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून सरकारी व खासगी बोटी/ट्रॉलरद्वारे सतत पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे.

नाका बंदी व वाहन तपासणी

जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर कठोर नाकाबंदी करण्यात आली असून कसून वाहन तपासणी केली जात आहे.

समुद्र किनारी गावांमध्ये जनजागृती

संवेदनशील कंपन्या, पोर्ट क्षेत्रे व किनारी गावे येथे पोलीस, सागर रक्षक दल व ग्रामस्थांच्या बैठका घेऊन
समुद्रमार्गातून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाल आढळल्यास त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :

  • जिल्हा नियंत्रण कक्ष : 02352-222222
  • डायल : 112
  • “समुद्र संदेश” व “रत्नागिरी पोलीस” अधिकृत WhatsApp चॅनल

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सांगितले की, “नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी आम्ही पूर्ण दक्ष आहोत.”


#Hashtags:

#RatnagiriNews #DelhiBlast #SecurityAlert #KonkanPolice #RatnagiriPolice #MaharashtraNews #BreakingNews #SafetyFirst #PoliceAlert #KonkanUpdates #SeaCoastSecurity

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें