नाटे सागरी पोलीस ठाण्याची राज्यस्तरीय दखल – उत्कृष्ट गुन्हे उकल, ISO मानांकन आणि CCTNS कार्यातील यशामुळे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते गौरव

नाटे सागरी पोलीस ठाण्याची राज्यस्तरीय दखल – उत्कृष्ट गुन्हे उकल, ISO मानांकन आणि CCTNS कार्यातील यशामुळे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते गौरव

राजापूर – संदीप शेमणकर
नाटे पोलीस ठाण्याने अलीकडच्या काळात विविध आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हा पोलीस दलात एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. गुन्हे उकल, प्रशासकीय शिस्त, तांत्रिक कामकाज आणि नागरिकाभिमुख सेवा या सर्व क्षेत्रांत ठाण्याने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते नाटे पोलीस ठाण्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
नाटे पोलीस ठाण्याने स्मार्ट सिटी पोलीस ठाणे म्हणून ISO मानांकन प्राप्त केले असून, आधुनिक सुविधा, डिजिटल कामकाज, तांत्रिक पर्यवेक्षण आणि पारदर्शक सेवांचा प्रभावी वापर यामुळे नाटे पोलीस ठाण्याची जिल्ह्यातील कामगिरी अधिक उजवी ठरत आहे.
गुन्हे तपासात ठाण्याने महत्वपूर्ण यश मिळवले आहे. गु.र. क्र. 74/2025 (BNS 303(2)) या गुन्ह्यातील ₹1,47,000 किमतीचा मुद्देमाल पुण्यातून शोधून काढण्यात नाटे पोलिसांना यश मिळाले. अचूक तपास, तांत्रिक माहितीचा योग्य वापर आणि तत्काळ कारवाईमुळे हा गुन्हा अल्पावधीत उकलण्यात आला.
त्याचप्रमाणे गु.र. क्र. 75/2025 (BNS 305(ड), 324(3), 331(2)) या घरफोडीच्या गुन्ह्याची फक्त 12 तासांत उकल करून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणांतील वेगवान आणि प्रभावी तपासाबद्दल सपोनी प्रमोद वाघ यांना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तांत्रिक कामकाजातही नाटे पोलीस ठाण्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. CCTNS प्रणालीमध्ये जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान नाटे पोलीस ठाण्याला मिळाला असून, CCTNS विभागाचे काम प्रभावीपणे सांभाळल्याबद्दल अंमलदार सुप्रिया बांदकर यांना देखील पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या सर्व यशस्वी कामगिरीमुळे नाटे पोलीस ठाण्याविषयी नागरिकांमध्ये अधिक विश्वास दृढ होत असून, सातत्यपूर्ण प्रगती आणि नागरिकांसाठीच्या संवेदनशील सेवेमुळे नाटे पोलीस ठाणे जिल्ह्यात आदर्श म्हणून ओळखले जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें