महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने यांच्या प्रचारात राजेश सावंतांचा सहभाग

महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने यांच्या प्रचारात राजेश सावंतांचा सहभाग

रत्नागिरी :

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या कन्या आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाविकास आघाडीच्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

 

रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी आज औपचारिक घोषणा करत म्हणाले की,

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शिवानी सावंत-माने यांना पाठिंबा देत मी स्वतः त्यांच्या प्रचारात उतरतो आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्यामुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांसह राजेश सावंतही प्रचारात सहभागी होणार असल्याने रत्नागिरीतील राजकारणाला वेगळीच रंगत येणार आहे, अशी चर्चाही शहरात सुरू झाली आहे.

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें