पडवे जि.प. गटातून अखेर उबाठा चे उमेदवार जाहीर तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि रवी आंबेकर यांना संधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पडवे जि.प. गटातून अखेर उबाठा चे उमेदवार जाहीर

तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि रवी आंबेकर यांना संधी

 

गुहागर (सुजित सुर्वे)– गुहागर तालुक्यातील पडवे जि.प. गटासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अखेर आपले उमेदवार निश्‍चित केल्याची चर्चा जोर धरत आहे. विद्यमान गुहागर तालुका प्रमुख सचिन वाईत आणि पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांना आमदार भास्करशेठ जाधव यांच्या शिफारशीने उमेदवारी देण्यात आल्याचे खात्रीशीर सूत्राकडून समजते.

पडवे पंचायत समिती गण रविंद्र आंबेकर, पडवे जिल्हा परिषद गट सचिन बाईत फायनल 

पडवे जि.प. गट हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून विद्यमान जि.प. सदस्य महेश नाटेकर हे निवडून आले होते. मात्र ऐन वेळी त्यांनी पक्षत्याग करून शिंदे गटात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली. या ‘गद्दारी’मुळे तालुक्यातील राजकीय वातावरण प्रदूषित झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे पडवे परिसरातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. कडवट शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच मतदारांनी यावेळी पडवे जि.प. गटातून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर येणाऱ्या उमेदवारांना एकदिलाने पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. “पुन्हा या गटात भगवा डौलाने फडकला पाहिजे, आणि  गद्दारांना यावेळी कायमचा गाडा,” अशी विनवणी पडवे, कुडली, आबळोली आदी परिसरातील  शिवसेने चे मतदार व कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे केली होती.

 

या पार्श्वभूमीवर पडवे जि.प. मतदारसंघातून तगडे आव्हान उभे राहील, अशी उमेदवारी अखेर जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

जाती निहाय राजकारण करण्यापेक्षा कर्तृत्वाच्या जोरावर मोठे होण्याची संधी द्या, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी उमेदवारी प्रक्रियेवेळी शिवसैनिकांना केले. “या गटात पुन्हा भगवा फडकवण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसेना (UBT) कार्यकर्त्याने आणि समर्पित मतदारांनी घेतली पाहिजे,” असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

 

स्व.बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचारवर ठाम असणारा हा गड पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार याची खात्री मतदार यांचे मध्ये आहे

आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पडवे जि.प. गटात खरी काटे की टक्कर होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

 

वार्ताहर : सुजित सुर्वे, पडवे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]