खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्था शाखा पूर्णगड या संस्थेमार्फत सहकार सप्ताह निमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन 

खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्था शाखा पूर्णगड या संस्थेमार्फत सहकार सप्ताह निमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

रत्नागिरी ~
खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्था शाखा पूर्णगड ता.जि. रत्नागिरी या संस्थेमार्फत सहकार सप्ताह निमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पूर्णगड नं.१, पूर्णगड खारवीवाडा, गावडे आंबेरे खारवीवाडा,मेर्वी या शाळांनी सहभाग घेतला.
पतसंस्थेने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांना वाव ,विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटवला आहे. या उपक्रमाला शाखा पालक श्री वासुदेवजी वाघे, जयवंतजी डोर्लेकर, शाखा अधिकारी निखिल आंबेरकर, पर्णिका आंबेरकर, सदिच्छा पावसकर, आडिविरकर मॅडम, हिदायत भाटकर सर, सुधीर कातळकर सर, जाधव सर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका-भारती तायशेटे, शिक्षक -पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पतसंस्थेने राबवलेल्या या उपक्रमाविषयी सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें