बौद्धजन विकास मंडळ, मौजे पेवे तर्फे सेवानिवृत्त सभासद सन्मान सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बौद्धजन विकास मंडळ, मौजे पेवे तर्फे सेवानिवृत्त सभासद सन्मान सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव संपन्न

तळवली.(मंगेश जाधव)

बौद्धजन विकास मंडळ, मौजे पेवे (मुंबई), बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. १३, मौजे पेवे (मुंबई), आम्रपाली महिला मंडळ, मौजे पेवे (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “धम्मचक्र प्रवर्तन दिन” निमित्त सेवानिवृत्त सभासद सन्मान सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमात बालवाडी ते पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यंचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे सन्मानीय कार्यकर्ते सिद्धार्थ मोहिते, सतीश जांबुर्गेकर, शशिकांत मोहिते, भीमराव जाधव यांचा संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून किशोर जाधव, रविंद्र पवार, हरिश्चंद्र जांबुर्गेकर, सिद्धार्थ कळंबे, रामदास कळंबे, विकास कदम, मधुकर जांबुर्गेकर, प्रदिप भेकरे, सुनील मर्चंडे, सुदेश कदम, राहुल जाधव तसेच संस्थेच्या सन्मानीय महिला – सभासदांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतेश कदम, संकेत जाधव, निलेश नागे आणि दिक्षा मोहिते यांनी केले तर हेमंत भेकरे, दिनेश मर्चंडे आणि सुविधा कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाअंती सुशांत जांबुर्गेकर यांनी सर्वांचे आपल्या भाषणातून आभार मांडले. संस्थेचे विद्यमान कार्यकर्ते रविंद्र कदम, रविंद्र महेंद्र कदम (कोषाध्यक्ष), रोहन जांबुर्गेकर, सचिन जाधव (हि. तपासनीस),निलेश मर्चंडे (अपघातनिधी प्रमुख), राजेंद्र जांबुर्गेकर, शैलेश मोहिते (कार्यालय प्रमुख), सुगंधा कदम (म. उपाध्यक्षा), विद्या जांबुर्गेकर,स्मिता कदम (म. सचिव), सुवर्णा कदम (म. कोषाध्यक्ष), प्राची मोहिते ( म. हिशोब तपासणीस) तसेच तरुण सभासद सुरेंद्र कदम, ऋषिकेश जांबुर्गेकर, सुचित कदम, रमण कदम, पंकज पवार, अनिश जांबुर्गेकर, सुरज भेकरे, सर्वेश जांबुर्गेकर, सम्यक जांबुर्गेकर यांचे व संस्थेच्या सन्मानीय सभासदांचे संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम स्वप्नील कळंबे आणि साधना कळंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]