नेरुळ जयंती उत्सव समितीचा संविधान गौरव सप्ताह जल्लोषात संपन्न…..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नेरुळ जयंती उत्सव समितीचा संविधान गौरव सप्ताह जल्लोषात संपन्न…..

 

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२५

नवी मुंबई – तू झेप घे अशी बनून जसा सिहांचा छावा, सळसळत्या रक्तात पेटू दे ” क्रांतीचा वणवा “. निर्माता अमोल मोहिते प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा संगीतमय अविष्कार याचे आयोजन नेरुळ जयंती उत्सव समिती ( रजि.) व नेरुळ जयंती उत्सव महिला संघ आयोजित ” संविधान गौरव सप्ताह ” ( २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ) निमित्त आगरी कोळी भवन, नेरुळ, नवी मुंबई येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार करून सामूहिक पंचशीलेचे ग्रहण करू झाली.यावेळी नेरुळ जयंती उत्सव समिती रजि. व नेरुळ जयंती उत्सव महिला संघ यांचे सर्व कार्यकर्ते आणि सभासद, तसेच विविध संस्थांमधून

अनेक सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांचे प्रतिनिधी आवर्जून या संविधान गौरव सप्ताह कार्यक्रमाच्या सांगतेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संविधान गौरव सप्ताह दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिर, २६ नोव्हेंबर रोजी डॉ. सुरेश माने यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतीचा वणवा या बुद्ध भीम गीतांचा संगीतमय आणि बहारदार कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक

दिनेश हेलोडे, गायक प्रशांत मोहिते, अभिषेक गमरे, गायिका

पूजा सावंत या सर्वांनी उपस्थित रसिकांना आपल्या सुरेख आवाजांनी, सुरांनी, नवीन ऊर्जा दिली.आपल्या गायिकीने रसिकांना गीतावर ठेका धरण्यास भाग पाडले. उपस्थित सर्वांनी संगीतमय कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. शेकडोच्या संख्येने सर्वजण या बहारदार कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता शेवटची शरणंते नि झाली.


पत्रकार – राज पवार ( पनवेल प्रतिनिधी ) 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]