जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जीवन ज्योती विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने खाऊवाटप

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जीवन ज्योती विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने खाऊवाटप

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ग्राम आधार स्वंयसेवी संस्थेची जीवन ज्योती विशेष शाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर व झोंबडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते परेश लांजेकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.यावेळी शाळेला लागणारी मदत नक्कीच आम्ही करू असे आश्वासन विनोद जानवळकर यांनी दिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शिंदे यांनी संस्था तसेच शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शिंदे यांचा तसेच शाळेतील शिक्षिका वर्षा सातपुते , काळजीवाहू मोहिनी कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार गणेश किर्वे उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें